Headlines

मलकापूर, नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विजेच्या समस्या प्रकरणी शिवसेना (उबाठा) आक्रमक; कार्यकारी अभियंता तायडे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन

मलकापुर:- मलकापुर व नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या म.रा.वि.वि कंपनी संदर्भात विविध तक्रारी असून कंपनी शेतकऱ्यांच्या तक्रारी कडे कानाडोळा करीत असल्याने शेतकऱ्यांना विहिरीत पाणी उपलब्ध असून पिकांना देता येत नाही, शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे आज दिनांक 16 सप्टेंबर रोजी नांदुरा व मलकापूर तालुक्यातील शंभर ते दीडशे शेतकऱ्यांना सोबत घेऊन शिवसेना सह संपर्कप्रमुख वसंतराव भोजने, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांनी म.रा.वि.वि कंपनी कार्यालयावर धडक दिली. कार्यकारी अभियंता आर.जी तायडे अमरावती येथील रुग्णालयात आय सी यु मध्ये दाखल असल्याने कनिष्ठ अभियंता ढोले यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी व शेतकऱ्यांचा रुद्रावतार पाहून तात्काळ संबंधित ठेकेदार,लाईनमन यांचेशी भ्रमणध्वनीवरून चर्चा करून अर्ध्या समस्या तात्काळ मार्गी लावल्या त्यामध्ये प्रामुख्याने नांदुरा तालुक्यातील गोसींग येथील कमळनाथ रस्त्यावरील डी.पी शंभर के.व्ही ची असून या डी.पी वर लोड येवून वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना शेतातील पिकांना पाणी देता येत नसल्याने पिके सुकून जात असल्याचे सांगितल्याने या डीपीवर “निरंतर योजनेअंतर्गत” त्या डीपीच्या बाजूलाच दुसरी डीपी बसवण्याचा प्रस्ताव तात्काळ मंजूर करण्यात आला,गोसींग येथील जुनी गावठाण डि.पी, विटाळी तालुका नांदुरा येथील शत्रुघन क्षीरसागर यांच्या शेतातील डी.पी चे अंतर चार किलोमीटर चे असून सदरची डीपी १६ केव्हीची असल्याने या डीपी वरती शेतकऱ्यांचे विद्युत पंप चालत नाही त्या ठिकाणी शंभर केव्हीची डीपी बसविण्याची मागणी निरंतर योजने अंतर्गत पूर्ण होईल, मलकापूर तालुक्यातील दुधलगांव येथील अजय लहू झनके, बळीराम बावस्कार, प्रल्हाद नारखेडे, पुरुषोत्तम नारखेडे, निनू लक्ष्मण पाटील यांच्या गट नंबर 314, 315, 316, या शेतातील वीस पोल वरील तीन किलोमीटरच्या परिसरातील विद्युत तार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले ते तारे तात्काळ बसून शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या, सावरगाव नेहू येथील माणिक सुरेश सुळे यांच्या शेतातील तार शिफ्टिंग, मलकापूर तालुक्यातील निंबारी येथील वसंत वराडे यांच्या शेतातील 63 के व्ही ची डीपी बदलून 100 के.व्ही, कुंड खुर्द येथील म्हाडा डि.पी वरील पोल झुकले तसेच शेंबा येथील नवाब डि.पी मेंन्टन्स मधून तात्काळ पोल सरळ करून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात ठेकेदाराला सूचना देण्यात आल्या, मलकापुर तालुक्यातील वाघोळा येथील गिल डीपी वरील ज्ञानदेव अहिर, अंबादास पाटील, गणेश अहिर, योगिता म्हस्कादे आदी शेतकऱ्यांच्या शेतातील 15 पोल वरील विद्युत तारा चोरट्यांनी लंपास केल्या असून त्या तारा ही तात्काळ ओढण्यात याव्यात, पंतनगर मधील रिजवाना परवीन शेख करीम यांच्या खाजगी प्लॉटमधून गेलेली विद्युत तार तात्काळ हटविण्यासंदर्भात या व इतर मागण्यांसाठी या आंदोलन करण्यात आले यावेळी युवा सेना तालुकाप्रमुख पवन गरुड, अल्पसंख्यांक सेना उपजिल्हाप्रमुख सै. वसीम सै.रहीम, वाहतूक सेना शहर प्रमुख इमरान लकी, विजय झांबरे, अनिल भारसाकळे, दत्तात्रय भारसाकळे, संतोष भारसाकळे, अनंता अंबुसकर, संजय राजपूत, आनंदा क्षीरसागर, विजय सिंग बिल्लारे, समाधान शिंदे, राहुल सुरडकर, अजय जाट, केसरसिंग जाट, बद्रीनाथ धोत्री, विष्णू भारसाकळे, रवी सुरळकर, भारत सुरडकर, अमरसिंग सोळंके, शेख हारून, गोपाल भागवत, शिवहरी गवळी, गजानन बावणे, पुंजाजी भोपळे, विजय सुरडकर, केसर सिंग जाट,दुधलगाव येथील अजय लहू झनके, लक्ष्मण बावस्कर, प्रल्हाद नारखेडे, पुरुषोत्तम नारखेडे, निनू लक्ष्मण पाटील, शेंबा येथील प्रमोद उत्तम दिवनाले, किशोर वराडे, रफीकभाई पजायेवाले सह नांदुरा व मलकापूर तालुक्यातील असंख्य शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!