Headlines

चाकू हल्ल्याने खामगावात खळबळ; जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न

खामगाव : जुन्या वादाचा राग मनात धरून एका २९ वर्षीय तरुणाला हॉटेलसमोर बोलावून चाकूने जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना खामगावातील भुसावळ चौक परिसरात घडली. चाकूचा वार अडविताना तरुणाच्या दोन्ही हातांसह कानाला दुखापत झाली असून, या प्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भारत प्रकाश सोनी (वय २९) यांना जुन्या वादातून आरोपींनी ३१ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास भुसावळ चौकातील निलकमल हॉटेलसमोर बोलावून घेतले. यावेळी विशाल ऊर्फ धम्मा देवनारायण यादव व शुभम देवनारायण यादव यांनी सोनी यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली. वादाचे रूपांतर हाणामारीत होताच आरोपींनी चाकू काढून भारत सोनी यांच्या पोटावर व गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सोनी यांनी प्रसंगावधान राखून वार अडविण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्या दोन्ही हातांना तसेच कानाला दुखापत झाली. गंभीर स्वरूपाचा हल्ला टळल्याने मोठा अनर्थ टळला. हल्ल्यानंतरही आरोपींनी चाकू दाखवून परिसरात दहशत निर्माण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी विशाल ऊर्फ धम्मा देवनारायण यादव व शुभम देवनारायण यादव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!