Headlines

मिलसमोरील रस्त्याकडेला रंगला जुगार; स्थानिक गुन्हे शाखेची धाड, सात जणांवर गुन्हा

खामगाव : एमआयडीसी परिसरातील राठी ऑईल मिलसमोरील रस्त्याच्या कडेला खुलेआम सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करीत सात जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, विविध कंपन्यांचे मोबाईल फोन आणि ५२ ताशपत्ते असा एकूण ४५ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सातही जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी खामगाव येथील राठी ऑईल मिलसमोर काही व्यक्ती जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे १ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे २.३६ वाजताच्या सुमारास पथकाने घटनास्थळी धाड टाकली. यावेळी जुगार खेळणाऱ्या सात जणांना ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणात गौरव गरड (रा. शिवाजीनगर), अक्षय शिंदे (रा. शिवाजीनगर), आकाश ठाकरे (रा. शिवाजी वेस), शिवाजी भडांगे (रा. दालफैल), सचिन भवटेरा (रा. इंदिरानगर), आदित्य दिवटे (रा. शिवाजी वेस) आणि सैय्यद इकरामुद्दीन सैय्यद शरीफ (रा. बर्डेप्लॉट, सर्व खामगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान आरोपींकडून रोख रक्कम, विविध कंपन्यांचे मोबाईल फोन तसेच ५२ ताशपत्ते असा एकूण ४५ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मनोज बचन बरडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!