Headlines

मलकापूर रेल्वे स्थानक परिसरात संशयास्पद हालचाल; चेहरा झाकून बसलेल्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात

मलकापूर : – रेल्वे स्टेशनशेजारील भाजीपाला मार्केट परिसरात अंधाराचा फायदा घेत चेहरा झाकून संशयास्पदरीत्या लपलेल्या एका तरुणाला मलकापूर शहर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना समोर आली आहे.
पोलिसांकडून परिसरात नियमित गस्त सुरू असताना हा तरुण संशयास्पद अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी त्याची चौकशी करून पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडे शॉकपचा पाईप आढळून आला.
ताब्यात घेतलेल्या तरुणाने आपले नाव रोशनकुमार दिनभवन (वय २७, रा. तरौली पुरे, भैसासूर, फैजाबाद, उत्तर प्रदेश) असे सांगितले.
या प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, पोलिसांच्या सतर्क गस्तीमुळे संशयास्पद हालचालीवर वेळीच कारवाई झाल्याचे दिसून आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!