Headlines

शाळेजवळ तंबाखूजन्य पदार्थांची विक्री; ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त

शेगाव : शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळताच शेगाव शहर पोलिसांनी कारवाई केली. हरलालका स्कूलजवळ छापा टाकून एका व्यक्तीकडून विविध प्रकारचे तंबाखूजन्य पदार्थ व सिगारेटची पाकिटे असा ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ ते ५.३० वाजताच्या सुमारास शेगाव शहर पोलिसांचे कर्मचारी शहरात पेट्रोलिंग करीत होते. यावेळी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हरलालका स्कूलजवळील परिसरात छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान शेख मोहम्मद शेख जाकीर (वय ५०, रा. आझादनगर, शेगाव) याच्या ताब्यात विविध कंपन्यांचे तंबाखू पुडे आणि सिगारेटची पाकिटे आढळून आली. पोलिसांनी नितीन तंबाखू पुडे, २० रवाल तंबाखू पुडे, १५ बुढा तंबाखू पुडे तसेच गोल्ड फ्लेक सिगारेटची दोन पाकिटे असा एकूण ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश वाकेकर यांच्या फिर्यादीवरून शेगाव शहर पोलिसांनी सिगारेट व तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ च्या कलम ६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!