रेल्वे गाडीसमोर आत्महत्या; खामखेड परिसरात अनोळखी इसमाचा मृतदेह

मलकापूर : खामखेड रेल्वे परिसरात रेल्वे गाडीसमोर आत्महत्या केल्याने अंदाजे ३८ ते ४० वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. या घटनेची नोंद मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, मृताची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
४ ऑगस्ट रोजी पहाटे ५.५२ वाजण्यापूर्वी खामखेड रेल्वे स्थानक परिसरातील कि.मी. ४८६/१३१५ येथे एका अनोळखी इसमाने रेल्वे गाडीसमोर आत्महत्या केल्याचे आढळून आले. याबाबत ट्रॅकमन समाधान भगवान पंडीत, युनिट क्रमांक ७, खामखेड स्टेशन यांनी पोलिसांना मेमो दिला. मेमोच्या आधारे मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात मर्ग क्र. २२/२०२६, कलम १९४ बीएनएसएस अन्वये नोंद करण्यात आली आहे. मृत इसमाचे वय अंदाजे ३८ ते ४० वर्षे असून, त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पदवीधर पोकॉ सरकटे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!