दारूच्या नशेत दुचाकी चालविणे पडले महागात; पोलिसांची कारवाई

मलकापूर : शहर पोलिसांनी राबविलेल्या ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमेत दारूच्या नशेत दुचाकी चालविणाऱ्या चालकावर कारवाई करण्यात आली. तहसील चौक परिसरात ही कारवाई करण्यात आली असून, संबंधित चालकाविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास तहसील चौक परिसरात सागर अरुण खर्चे (वय ३२, रा. भालेगाव) हा एमएच २८ एयू १२७६ क्रमांकाची दुचाकी दारूच्या नशेत चालविताना आढळून आला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेत उपजिल्हा रुग्णालय, मलकापूर येथे वैद्यकीय तपासणीसाठी नेले.
वैद्यकीय तपासणीनंतर संबंधित चालकाने मद्यप्राशन केले असल्याचा अभिप्राय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. याप्रकरणी पोकॉ मोहन समाधान करांगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मलकापूर शहर पोलिस ठाण्यात मोटार वाहन कायदा कलम १८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!