शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास; ५८ वर्षीय इसमाची आत्महत्या, मलकापूर तालुक्यातील घटना!

मलकापूर : तालुक्यातील वडोदा येथील ५८ वर्षीय इसमाने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना २३ जून रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वडोदा येथील रहिवासी अरुण रामचंद्र मुंढे (वय ५८) यांनी गावालगतच्या शिवारातील गट क्रमांक ४४९ मधील शेतात लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २३ जून रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी मृताचे नातेवाईक गणेश अरुण मुंढे यांनी मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यांच्या तक्रारीनुसार, मृत्यूबाबत कोणावरही संशय अथवा तक्रार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी मर्ग नोंद केली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रघुनाथ जाधव करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!