चांदमारी परिसरात ६१ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

खामगाव : शहरातील चांदमारी परिसरात एका ६१ वर्षीय व्यक्तीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी पुंडलीक तासतोडे (वय ६१, रा. चांदमारी) हे २१ जून रोजी चांदमारी परिसरातील टेकडीवर असलेल्या निंबाच्या झाडाला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. गल्लीत राहणारे सोनू श्रावण गायकवाड यांनी दूरध्वनीद्वारे घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांचा मुलगा अभिषेक संभाजी तासतोडे (वय २४) घटनास्थळी पोहोचला. घटनेची माहिती मिळताच खामगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर अभिषेक तासतोडे यांनी दिलेल्या माहितीवरून खामगाव शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या प्रकरणाची नोंद पोलीस कर्मचारी शफाकत कुरेशी यांनी केली असून पुढील तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक दीपक इलामे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!