Headlines

वडिलांच्या उपचारासाठी बाहेरगावी गेलेल्या व्यावसायिकाच्या घरात चोरी, दाग दागिन्यांसह ६८ हजारांचा ऐवज लंपास..

खामगाव : येथील टीचर कॉलनी भागात एका व्यावसायिकाचे घर फोडून अज्ञात चोरट्याने रोख रकमेसह ६८ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तक्रारी वरून पोलिसांनी, गुन्हा दाखल केला आहे. टीचर कॉलनीतील ट्रान्सपोर्ट व्यवसायिक जमालउद्दीन मोहीउद्दीन देशमुख (४०) हे ३० एप्रिल रोजी वडिलांच्या उपचारकामी नागपूरला गेले होते. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाज्याचा कडी कोंडा तोडून आत प्रवेश केला व घरातील लाकडी कपाटाचे लॉकतोडून त्यातून ४० हजार रोख रक्कम, लहान मुलांच्या चैनपट्ट्या, बांगड्या तसेच त्यांच्या पत्नीच्या चांदीच्या चैनपट्ट्‌या असा एकूण ६८ हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना १२ मे रोजी उघडकीस आली. याबाबत जमालउद्दीन मोहीउद्दीन देशमुख यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम ३८०, ४५४, ४५७, भादंवी नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *