लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याचा राग; शेजारी कुटुंबावर हल्ला

खामगाव : आवार येथे लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या कारणावरून शेजारी राहणाऱ्या कुटुंबावर काठीने हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामेश्वर नामदेव काळे (वय ५०, रा. आवार) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली. आरोपी प्रकाश किसन टाले, धिरज प्रकाश टाले व रोशन प्रकाश टाले हे फिर्यादीच्या घराशेजारी राहतात. फिर्यादीच्या पुतणीचा विवाह आरोपी धिरज टाले याच्यासोबत ठरला नसल्याचा राग आरोपींच्या मनात होता. याच कारणावरून ८ जून रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता आरोपींनी फिर्यादीच्या घरासमोर येऊन वाद घातला. त्यानंतर संगनमत करून फिर्यादी, त्यांचा भाऊ व सून यांना काठ्यांनी मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
फिर्याद व वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे खामगाव ग्रामीण पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118(1), 352, 351(2) व 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!