मलकापुरात एलसीबीची धडक कारवाई; जुगार अड्ड्यांवर छापे, तिघे ताब्यात

मलकापूर:- शहरासह एमआयडीसी दसरखेड परिसरात सुरू असलेल्या अवैध जुगार व्यवसायावर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत विविध ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम आणि जुगार साहित्य असा एकूण ६ हजार ५२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड व श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १८ मे रोजी मलकापूर शहर व एमआयडीसी दसरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापेमारी केली. या मोहिमेत पोलीस अंमलदार अनुपकुमार मेहेर, विजय वारुळे, गजानन दराडे, युवराज राठोड, मंगेश सनगाळे, अमोल वनारे व समाधान टेकाळे यांनी सहभाग घेतला. छापेमारीदरम्यान आरोपी हे पैशांच्या हारजितवर वरली मटका व इतर जुगार प्रकार चालवत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपींना रंगेहात पकडले.
या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!