परीक्षेला जाताना काळाचा घाला; २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू

 

चिखली : – चिखली मार्गावरील हातणी परिसरात १२ फेब्रुवारी रोजी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास ट्रक आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
मृत तरुणाचे नाव शंतनू नारायण अंभोरे (वय २३, रा. एकलारा) असे असून तो परीक्षेसाठी जात असल्याचे समजते. अपघाताची माहिती मिळताच पीएसआय गाढे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा सामान्य रुग्णालय, चिखली येथे पाठवण्यात आला आहे. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास चिखली पोलिसांकडून सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!