एसटी बस-दुचाकी समोरासमोर धडक; तिघे गंभीर जखमी!

 

चिखली :- चिखली–अमडापूर मार्गावर राज्य परिवहन महामंडळाच्या बसची दुचाकीला समोरासमोर धडक बसून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीवरील तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी (४ फेब्रुवारी) दुपारी सुमारे दीडच्या सुमारास बीडहून अमरावतीकडे जाणारी एसटी बस चिखली मार्गे जात असताना चुकीच्या बाजूने येणाऱ्या दुचाकीशी जोरदार धडक झाली. धडकेमुळे दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर फेकले गेले. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीस धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. मात्र जखमींची नावे अद्याप समजू शकलेली नाही. अपघातामुळे काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!