Headlines

घरासमोर उभी केलेली कार चोरीला; एक संशयित ताब्यात, दुसरा फरार; मोताळा येथील घटना

मोताळा :- शहरातील प्रभाग क्रमांक १६ मध्ये घरासमोर लावलेली कार चोरट्यांनी लंपास केल्याची घटना १ मे रोजी सकाळी उघडकीस आली. गणेश नंदलाल झंवर यांच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, एकास ताब्यात घेतले आहे. झंवर यांनी ३० एप्रिल रोजी रात्री १०.४५ वाजता त्यांच्या (MH-28/AN/3161) क्रमांकाच्या कार घरासमोर पार्क केली होती. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी ६.४५ वाजता कार गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी शेख सत्तार उर्फ सत्तार घंटी आणि शेख शोएब शेख सत्तार यांच्यावर चोरीचा संशय व्यक्त केला. पोलिसांनी सत्तार याला ताब्यात घेतले असून शोएब अद्याप फरार आहे. पुढील तपास पोहेकॉ अशोक आडोकार आणि पोकॉ ज्ञानेश्वर धामोडे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!