मलकापूर : येथील स्कूल ऑफ स्कॉलर्स (CBSE) मलकापूर शाळेतील इयत्ता सहावीचा विद्यार्थी कु. कियान विवेक डागा याने डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा यशस्वीरीत्या पार करून सिल्वर मेडल मिळवले आहे.
कियानने या स्पर्धेच्या चारही फेऱ्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. प्रारंभीच्या दोन लेखी पात्रता परीक्षांमध्ये यश संपादन केल्यानंतर, तिसऱ्या फेरीत Sustainable Landscaping या थीमवर आधारित Garden of Connection या विषयावर उत्कृष्ट प्रकल्प सादर केला. अंतिम मुलाखतीच्या फेरीत त्याने सर्वाधिक गुण मिळवत सिल्वर मेडल प्राप्त केला. कियानच्या या यशाबद्दल संपूर्ण स्कूल ऑफ स्कॉलर्स परिवारात आनंदाचे वातावरण आहे. शाळेचे संचालक ॲड. अमरकुमार संचेती व मुख्याध्यापिका सौ. सुदिप्ता सरकार यांनी कियानचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शिक्षकवर्ग आणि पालकांकडूनही कियानच्या परिश्रमाचे कौतुक होत आहे.
मलकापूरचा कियान डागा ‘बाल वैज्ञानिक’ सन्मानित, सिल्वर मेडल पटकावले
