मलकापूर: राष्ट्रीय महामार्गावर दसरखेड जवळ एमआयडीसी पोलिसांनी एक कंटेनर थांबवून तपासणी केली. कंटेनरमध्ये २५,१९,४०० रुपये किंमतीचा अवैध गुटखा, सुगंधित तंबाखू आणि पान मसाला सापडला. कंटेनर चालकाने आवश्यक कागदपत्रे सादर केली नाहीत, त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
जप्त केलेल्या मालात ५१२० पॅकेट गुटखा, ५१२० पॅकेट तंबाखू, ९१०० पॅकेट पान मसाला आणि इतर प्रतिबंधित पदार्थ समाविष्ट आहेत. कुल जप्तीची किंमत ३९,६९,४०० रुपये आहे.गुलाबसिंग वसावे, अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमराज कोळी करत आहेत.ही कारवाई पोलीस अधिक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.