Headlines

खासदार बळवंत वानखेडे यांचे वादग्रस्त वक्तव्य, इतिहासाचा अपमान करणाऱ्यांच्या विरोधात आम्ही संघर्ष करू – शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

मलकापूर: अमरावतीचे विद्यमान खासदार बळवंत वानखेडे यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक गडकिल्ल्यांवर मशीद झाली पाहिजे,असे वादग्रस्त विधान केले आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ मलकापूर शहरात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मलकापूर विभागाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली.श्री ओम शिंदे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मलकापूर विभागाचे प्रमुख, यावेळी बोलत होते. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, ‘डाव्या विचारसरणीचे आणि जिहादी शक्तींचे हात मिळवून हिंदुत्व, हिंदुधर्म आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचा अपमान करणाऱ्यांच्या विरोधात आम्ही संघर्ष करू. हिंदू समाजाला डिवचण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही कदापि खपवून घेणार नाही. भविष्यात अशा प्रकारची उत्तेजनात्मक वक्तव्ये केल्यास श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

14 नोव्हेंबर रोजी मलकापूर शहरात जागरूक मलकापूर कृती समिती, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि सकल हिंदू समाज यांच्या वतीने एक भव्य ‘हिंदू स्वाभिमान मेळावा’ आयोजित केला जाणार आहे. यामध्ये हिंदू संघटनांचे समाजाच्या विविध स्तरांतील लोक सहभागी होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *