चिखली :- रस्त्यात बंद पडलेल्या एसटी बसला धडकून तीन दुचाकीस्वार ठार झाले. हा अपघात काल, ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडला.चिखली-मेहकर रोडवर वरदडा फाट्याजवळ आदिवासी पारधी शाळेजवळ एक एसटी बस बंद पडली होती. या बसला सायंकाळी सात वाजताच्या सुमारास पाठीमागून आलेली दुचाकी धडकली. या अपघातात दुचाकीवरील तीन युवक जागीच ठार झाले. गोपाल पंढरी सुरडकर (वय २१, रा. बेराला) धनंजय परमेश्वर ठेंग (वय २५, रा. वाघापूर) व सुनील सुभाष सोनुने (वय ३५ रा. खडकपुरा, चिखली अशी मृतांची नावे आहेत.
ही बस चिखली आगाराची होती. घटनेची माहिती मिळताच साखरखेर्डा पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन करेवाड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह चिखली येथे हलविले.