Headlines

चार दिवस जगा पण वाघा सारखे म्हणजे संत भीमा भोई सारखे जगा – ह.भ.प. कृष्णा महाराज पाटील

मलकापूर : रावणा सारखा श्रीमंत कोणी नाही वारकऱ्यासारखा सांप्रदाय नाही आणि शिवाजी महाराजांसारखा दुसरा छत्रपती होणे नाही. चारच दिवस जगा पण वाघा सारखा म्हणजेच संत भीमा भोई सारखा जगा असे प्रतिपादन ह.भ.प. कृष्णा महाराज पाटील यांनी आयोजित कीर्तनाच्या कार्यक्रमात केले.

भोई समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी भीमा भोई यांची 174 वी जयंती निमित्त ह.भ.प कृष्णा महाराज पाटील यांच्या कीर्तनाचे आयोजन स्थानिक भोई समाज बांधवांकडून माता महाकाली नगर येथील शिव मंदिर येथे करण्यात आले होते.सर्वात आधी श्री संत शिरोमणी भीमा भोई यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलन, पुष्पहार अर्पण करून कीर्तनाला प्रारंभ करण्यात आले. हभप कृष्ण महाराज पाटील यांनी संत भीमा भोई यांचे कार्य आणि त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांविषयी माहिती देत मार्गदर्शन केले. या कीर्तनाला महिलांची व पुरुषांची मोठी उपस्थित लाभली होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समस्त भोई समाज बांधवांनी अथक परिश्रम घेतले. दरम्यान कार्यक्रमानंतर माजी नगराध्यक्ष हरीश रावळ, माजी नगरसेवक अशांतभाई वानखेडे, माजी न.प. कर्मचारी सुभाष बावस्कर यांचा सत्कार करण्यात आला.

छोटा वारकरी आनंद महाराज यांनी वेधले साऱ्यांचे लक्ष

आपण नेहमीच कीर्तनाचा कार्यक्रम असला की आपल्या समोर मृदुंग वाजवणारे वृद्धांचा चेहरा समोर येतो मात्र शिव मंदिर येथील कीर्तनाच्या कार्यक्रमात मृदुंग वाजवणारा छोटा वारकरी ह.भ.प. आनंद महाराज उखर्डे यांनी आपल्या कलेतून साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. लहान पणा पासुन वारकरी संप्रदायाची आवड असल्याचे त्यानी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!