( वृतसंस्था )
अकोला :- येथील जुने शहर भागातील हरिहर पेठ भागात दोन गट आज समोरासमोर भिडले. यावेळी दोन्ही गटांकडून तुफान दगडफेक करण्यात आली. तसेच वाहनांची जाळपोळ करण्यात आली. आज, ७ ऑक्टोबर रोजी ही दंगल झाली. यामुळे हरिहर पेठ परिसरात संचारबंदी लागल्यासारखे दृश्य निर्माण झाले.प्राप्त माहितीनुसार, हरिहर पेठ भागात एक ऑटोरिक्षा आणि दुचाकी वाहनाची धडक झाली. यातून ऑटोरिक्षाचालक आणि दुचाकीचालक यांच्यात वाद झाला. हा वाद वाढल्याने त्याचे पर्यवसन दंगलीत झाले. यावेळी गाडगेनगर परिसर आणि हमजा प्लॉट भागातील मोठा जमाव घटनास्थळी जमा झाला. दोन्ही गटांनी प्रक्षोभक घोषणा देत एकमेकांच्या दिशेने तुफानी दगड फेक केली. यामुळे रस्त्यावर दगडांचे खच साचल्याचे दिसून आले. यावेळी एक ऑटोरिक्षा आणि तीन दुचाकी जाळण्यात आल्या.