मलकापूर दि. ०६ ऑक्टोबर
येथील माता महाकाली नगरातील गायत्री नवदुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराजांचे शिष्य, युवा कीर्तनकार ऋषीपाल महाराज यांचे समाज प्रबोधन कर कीर्तन आज दि ०६ ऑक्टोबर रविवार रोजी सायंकाळी ८ वाजता माता महाकाली नगर येथे संपन्न होणार आहे. नवरात्र उत्सवानिमित्त गायत्री मंडळाच्या वतीने विविध समाज प्रबोधन पर कार्यक्रम व शैक्षणिक व सामाजिक उपक्रमा अंतर्गत अनेक कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांकरिता सामान्यज्ञान स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, ज्येष्ठ महिलांकरता श्लोक व मंत्रोच्चार व गायत्री मंत्र पठन स्पर्धा आरोग्य तपासणी शिबिर असे विविध कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. या निमित्ताने आज होणाऱ्या समाज प्रबोधन पर किर्तन कार्यक्रमासाठी नागरिक माता भगिनींनी मोठ्या उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
आज सप्तखंजेरी वादक ऋषिपाल महाराज यांचे समाज प्रबोधन पर किर्तन
