मोताळाः एका २५ वर्षीय युवकाने केबलच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २४ रोजी सप्टेंबर संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास तरोडा येथे उघडकीस आली. याप्रकरणी तक्रारीवरून बोराखेडी पोलिसात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील तरोडा येथील महादेव सुखदेव वाकोडे यांनी बोराखेडी पोलीसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की २४ सप्टेंबर रोजी त्यांचा पुतण्या सागर सहदेव वाकोडे (२५) याने राहत्या घरात टिनाच्या अँगलला पांढऱ्या केबलच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे नमूद केले आहे. सागर ने आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण समजू शकले नाही.घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक यशवंत तायडे, पोलिस कॉन्स्टेबल नीलेश राठोड हे करीत आहे.