खामगाव :- ब्युटी पार्लर चालवणाऱ्या एका महिलेचा ब्युटी पार्लर मध्ये घूसून विनयभंग करण्यात आल्याची घटना खामगाव शहरात घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी गोपाल दुतोंडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील पीडित महिला ४० वर्षांची आहे. महिलेचे खामगाव शहरात ब्युटी पार्लर आहे. या पार्लर मध्ये घुसून गोपाल दुतोंडे याने नको ते वर्तन केले.पिडीत महिलेच्या तक्रारीनुसार आरोपीने महिलेच्या घराच्या खिडकीच्या काचा देखील फोडल्या. खिडकीत असलेले साहित्य फेकून दिले. शिवाय महिलेला नको त्या ठिकाणी हात लावून वाईट उद्देशाने विनयभंग केला असा आरोप पिडीत महिलेने केला आहे. तक्रारीवरून पोलिसांनी गोपाल दुतोंडे विरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.