मलकापूरच्या राजकारणात ओबीसी नगराध्यक्षपदासाठी सौ. चेतनाताई राठींचं नाव चर्चेच्या शिखरावर!
मलकापूर ( दिपक इटणारे ) : – आगामी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण रंगतदार बनले आहे. विशेष म्हणजे काँग्रेस पक्षाकडून ओबीसी आरक्षणाच्या नगराध्यक्ष पदासाठी इंजि. सौ. चेतनाताई गिरीराज राठी यांचे नाव सध्या शहरभर चर्चेत आहे. नागरिकांमध्ये आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येही त्यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक चर्चा सुरू असून राठी परिवार यांना पक्षाने पुन्हा संधी दिली तर…
मलकापूर शहरात दिवसा ढवळ्या घरात घुसून चोरी तब्बल साडेसहा लाखांचा मुद्देमाल लंपास; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश ऐरणीवर
मलकापूर :- चैतन्यवाडी परिसरात दुपारच्या सुमारास घरफोडीची घटना घडून शहरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत चोरट्यांनी घरातील कपाट फोडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाइल असा एकूण ₹6,55,683 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची फिर्याद मलकापूर शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. फिर्यादी रविकुमार शिवाजी राठोड (वय 32 वर्षे, रा. चैतन्यवाडी, मलकापूर, मूळ रहिवासी गांधारी, ता….
मलकापूर शहरात अल्पवयीन मुलीचं सिनेस्टाईल अपहरण घडले कसे, बातमीत वाचा; तीन आरोपींवर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल!
मलकापूर :- गंगेश्वर मंदिर परिसरात शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली. या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध पोस्को कायद्यासह संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादी डॉ. मोहम्मद कलिम शेख कासम (वय 54, रा. छोटा बाजार, मलकापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या 13 वर्ष 11 महिने 19…
सायखेड येथे शेतमजुरांवर अस्वलाचा हल्ला; एक गंभीर तर एक किरकोळ जखमी
संग्रामपूर:- तालुक्यातील सायखेड शिवारात गुरुवारी सकाळी शेतात काम करत असलेल्या दोन शेतमजुरांवर अस्वलाने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात एक शेतमजूर गंभीर तर दुसरा किरकोळ जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सायखेड येथील सलीम हुसेन केदार (वय ३०) आणि जालम हुसेन सुरत्ने (वय ५०) हे दोघे गुरुवारी सकाळी त्यांच्या संत्रा बागेत पाइप उचलून ठेवत…
एमआयडीसी दसरखेड पोलीस ठाण्यातील लाचखोर पोलिस हेडकॉन्स्टेबल सतीश वैद्यकर लालूचपत विभागाच्या जाळ्यात, गुन्हा दाखल
मलकापूर:- गैरलाभ मिळविण्याच्या उद्देशाने २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी मलकापूर एमआयडीसी दसरखेड पोलीस ठाण्यात कार्यरत पोलिस हेडकॉन्स्टेबलवर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लोकसेवक सतीश रतन वैद्यकर (वय ४०, पोलीस हेडकॉन्स्टेबल, पो. स्टे. एमआयडीसी दसरखेड, मलकापूर) याने तक्रारदार विजय ठाकूर यांच्या नावावर असलेल्या…
धुपेश्वर खून प्रकरणातील चार आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी; नऊ आरोपींवर गुन्हा दाखल; चार अटक तर पाच फरार
मलकापूर / धुपेश्वर :- धुपेश्वर येथे किरकोळ वादातून धारदार हत्याराने तरुणाचा खून व एक जण गंभीर जखमी झाल्याच्या प्रकरणातील चार आरोपींना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही घटना मंगळवार, दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास धुपेश्वर मंदिराजवळ घडली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्यादी…
धुपेश्वर येथे किरकोळ वादातून तरुणाचा खून; एक जखमी नऊ आरोपींवर गुन्हा दाखल; चार अटक तर पाच फरार
मलकापूर /धुपेश्वर:- येथील मंदिराजवळ किरकोळ वादातून धारदार हत्याराने तरुणाचा खून करण्यात आला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवार, दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नऊ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सुरज सुनिल झाल्टे (वय २१ वर्षे, रा. पिंपराळा, ता. मुक्ताईनगर, जि….
रेल्वे अपघातात अनोळखी पुरुषाचा मृत्यू; लोहमार्ग पोलीसांचे ओळख पटविण्याचे आवाहन
शेगाव :- लोहमार्ग पोलीस ठाणे शेगाव हद्दीत बोदवड रेल्वे स्टेशन येथे एका अनोळखी पुरुषाचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाला. ही घटना 08 ऑक्टोबर रोजी घडली असून, घटनेची नोंद पोलीस हवालदार अमोल खोडके यांनी घेतली आहे. प्राथमिक तपासानुसार मृत व्यक्तीचा मृत्यू रेल्वे अपघातात झाल्याचे समोर आले आहे. मृत व्यक्तीचे वर्णन वय अंदाजे 35 ते 40 वर्षे, उंची…
पैशाच्या वादातून युवकावर विळ्याने हल्ला; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल! देऊळगाव राजा येथील घटना
देऊळगाव राजा :- शहरातील समतानगर भागात पैशाच्या वादातून एका युवकावर धारदार शस्त्राने हल्ला करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना ५ ऑक्टोबर रोजी दुपारी घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून देऊळगाव राजा पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.माहितीनुसार आकाश खंदारे याच्याकडे सोयाबीन विक्रीसंबंधी इसाराचे काही पैसे देणे-घेणे प्रलंबित होते. याच कारणावरून वाद निर्माण…
