घरात घुसून पतीला मारहाण, पत्नीचा लैंगिक छळ; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल, देऊळगाव राजा तालुक्यातील घटना!
देऊळगावराजा : एका ३५ वर्षीय विवाहितेचा लैंगिक छळ करण्यात आला. तसेच पीडितेच्या पतीला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तालुक्यातील एका गावात ही घटना समोर आली आहे. गावातील घराशेजारीच राहणाऱ्यांनी हे कृत्य केले, अशी तक्रार महिलेने पोलीस ठाण्यात दिली आहे. तक्रारीनुसार, ही महिला घरी असताना शेजारीच राहणारा आरोपी सतीश बाबासाहेब शिंदे हा तिच्या घरी…
