बँकेच्या कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल!

खामगावः तालुक्यातील गणेशपूर येथे बँकेच्या कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी आठ वाजता उघडकीस आली. मृत शेतकऱ्याचे नाव राजू कचरू मोरे (४८) असे आहे. यासंदर्भात गावातील मगन कचरू मोरे यांनी हिवरखेड पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यानुसार, राजू मोरे यांच्यावर गणेशपूर येथील ग्रामीण कोकण बँकेचे ६० हजार रुपये कर्ज थकीत होते. यावर्षी पिकाचे उत्पन्न समाधानकारक…

Read More

नाकाबंदी दरम्यान अवैध गुटखा व वाहनासह दहा लाखांचा मुद्देमाल जप्त!

खामगाव : गुप्त माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी एका वाहनासह ९ लाख ९६ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. मंगळवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. शहर पोलिस स्टेशनचे कर्मचारी नाकाबंदीदरम्यान वाहनांची तपासणी करीत असताना, नितीन मधुकर इंगळे (वय ३८, रा. शिरसगाव निळे, ता. शेगाव) याने एमएच-२८-एबी-७४५ क्रमांकाच्या मालवाहू वाहनातून शासनाने प्रतिबंधित व मानवी आरोग्यास अपायकारक असलेल्या गुटख्याची…

Read More

अल्पवयीन मुलीचा जिम ट्रेनरकडून विनयभंग पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल! खामगाव शहरातील घटना

खामगाव : एक अल्पवयीन मुलगी एक्झरसाईज करीत असतांना जिम ट्रेनरने तिच्याजवळ जावून एक्झरसाईज करण्याबाबत सांगतांना तिच्या लज्जेस धोका पोहोचेल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. त्यामुळे अल्पवयीन मुलगी घरी निघून गेली व आईला ही बाब सांगितली. ही घटना १६ ऑक्टोबर २४ रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास शहरात घडली. याप्रकरणी खामगाव शहर पोस्टेमध्ये दिलेल्या फिर्यादीवरून हेल्थ…

Read More

माझ्या मित्रा सोबत वाद का केला म्हणत चाकूने वार करून केले जखमी, खामगाव पोलिसात गुन्हा दाखल!

खामगाव : मित्रासोबत वाद का केला असे म्हणून युवकाने इसमास चाकुने पाठीवर मारुन जखमी केल्याची घटना शहरालगत वाडी येथील इंदिरा नगरात घडली. याबाबत संतोष शालीग्राम दामोदर वय ४५ रा. इंदिरा नगर वाडी यांनी शहर पोस्टेला तक्रार दिली की, १६ऑक्टोंबर रोजी ते गावात ग्रंथ समाप्तीच्या कार्यक्रमामध्ये गेले होते. यावेळी गावातीलच अभिजीत गवई वय ३० हा तेथे…

Read More

पावसामुळे शेतीचे नुकसान, चिंताग्रस्त शेतकऱ्याने गळफास घेत संपवली जीवन यात्रा!

खामगाव : पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने चिंताग्रस्त झालेल्या एका शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवन यात्रा संपवण्याची घटना शनिवारी घडली. राजेश जगन्नाथ धनोकार ( वय ४५ ) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. राजेश धनोकार या शेतकऱ्याची पळशी शिवारात शेती आहे. या शेतीचे अतिपावसामुळे नुकसान झाले, त्यामुळे हा शेतकरी सतत चिंताग्रस्त राहत होता. अशातच शनिवारी…

Read More

दवाखान्याच्या कामासाठी अकोला जात होते, चोरट्याने खिशातील 20 हजार गायब केले, खामगाव बस स्थानकावरील घटना!

खामगावः येथील बसस्थानकावर बसमध्ये चढत असतांना अज्ञात चोरटयाने एका इसमाच्या खिशातील २० हजार रुपये लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.येथील देशमुख प्लॉट भागातील मनोज बलराम मावळे वय ५६ हे २८ सप्टेंबर रोजी कामाकरीता दवाखान्याच्या अकोला जाण्यासाठी खामगाव बसस्थानकावर आले. यावेळी बसमध्ये चढत असतांना गर्दीचा फायदा घेवून अज्ञात चोरटयाने मावळे यांच्या खिशातील २० हजार रुपये लंपास…

Read More

ई बाईक च्या डिक्कीत ठेवलेले दीड लाख लंपास, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल! खामगाव येथील घटना

  खामगाव : ई-बाईकच्या डिकीत ठेवलेले दीड लाख रुपये अज्ञात चोरट्याने चोरून नेले. मंगळवारी कोर्ट परिसरात ही घटना घडली. सुटाळा खुर्द येथील शेख खुर्शिद शेख तुराब (६३) यांनी २४ सप्टेंबर रोजी कॅनरा बँकेतून दीड लाख रुपये काढले. त्यांनी हे पैसे ई-बाईकच्या डिकीत ठेवले व कामानिमित्त कोर्ट परिसरात आले. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या…

Read More

पादचारी वृद्ध इसमाला अज्ञात वाहनाची धडक, वृद्धाचा मृत्यू!

खामगाव : अज्ञात वाहनाने पायी जाणाऱ्या एका ७० वर्षीय अनोळखी वयोवृद्ध इसमाला धडक दिली. यात पादचारी वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना नॅशनल हायवे क्र. ५३ वरील वडीजवळ २२ सप्टेंबर रोजी रात्री ११:३० वाजता उघडकीस आली. प्राप्त माहितीनुसार, ७० वर्षीय एक अनोळखी वयोवृद्ध इसम रस्त्याने जात असताना नॅशनल हायवे क्र. ५३ वरील वडीजवळ त्यास एका अज्ञात वाहनाने…

Read More

खामगाव येथील मंगल कार्यालयाला आग; आठ ते दहा सिलेंडरचा स्फोट, लाखो रुपयांचे नुकसान

खामगाव : नांदुरा रोडवरील श्रीहरी लॉन्स मंगल कार्यालयाला मंगळवार, दि.२४ सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारासआग लागली. या आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत आठ ते दहा सिलेंडर जळून भस्मसात झाले. कुठलीही जीवित हानी झाली नसली, तरी मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाल्याचे समोर येत आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याच्या अंदाज वर्तविल्या जात आहे. आगीत एका…

Read More

प्रेम संबंधातून शारीरिक संबंध ठेवले नंतर लग्नास नकार दिला, विवाहित तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल!

खामगाव : प्रेम संबंधातून विवाहितेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिला धर्मांतराची गळ घातली व नंतर तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला अशा आशयाच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी विवाहित तरुणांसह तिघांविरुद्ध विविध कलमाने गुन्हे दाखल करून एकाला अटक केली आहे.स्थानिक शिवाजीनगर पोस्टेच्या हद्दीतील जुना फैल भागातील पंचवीस वर्षीय विवाहित तरुणाने विवाहित तरुण महिलेसोबत प्रेम संबंध प्रस्थापित केले यामधून…

Read More
error: Content is protected !!