डॉ.राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालय मलकापूर विद्यार्थ्यांच्या चमुने रसायनशास्त्र स्पर्धेमध्ये पटकावला प्रथम क्रमांक

  मलकापूर :- स्थानिक विज्ञान महाविद्यालय मलकापूर यांच्या रसायनशास्त्र विभागामार्फत तालुकास्तरीय आंतर महाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धा 19 ऑक्टोबर 2024 रोजी आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेचे आयोजन विज्ञान महाविद्यालयातील पी.जी. केमिस्ट्री असोसिएशनने केले होते. या स्पर्धेत डॉ. राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी, मलकापूर डॉ.व्ही.बी. कोलते कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मलकापूर व आयोजक विज्ञान महाविद्यालय मलकापूरच्या तीन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी…

Read More

पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांची यशस्वी औद्योगिक भेट

मलकापूर: पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूरच्या मेकॅनिकल विभागाने विद्यार्थ्यांना उद्योगातील व्यावसायिक ज्ञान मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या तांत्रिक कौशल्यांचा विकास करण्यासाठी तीन प्रमुख उद्योगांना भेट दिली. विद्यार्थ्यांनी प्रथम भेट दिली आयजीटीआर छत्रपती संभाजीनगर येथे श्री. अनिकेत देशमुख यांनी विद्यार्थ्यांना उद्योगातील वास्तविक उत्पादन प्रक्रियेची माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना डिझाईनपासून अंतिम उत्पादनापर्यंतच्या सर्व टप्प्यांची सविस्तर…

Read More

भाजपच्या पहिल्या यादीत मलकापूर चे नाव नाही ? मलकापूर मतदारसंघात भाजपकडून कोणाला मिळणार उमेदवारी ? मनीष लखानी यांच्या नावाची चर्चा

मलकापूर : भारतीय जनता पार्टीच्या वतीने काल विधानसभेच्या ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यात बुलडाणा जिल्ह्यातील तीनही भाजपाच्या विद्यमान आमदारांची नावे असून मलकापूर विधानसभा मतदार संघाचा समावेश नसल्याने मलकापूर मतदार संघातून भाजपाचा उमेदवार कोण? अशी चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये महायुतीचा घटकपक्ष असलेल्या भाजपाच्या वाट्याला चार जागा असून त्यापैकी त्यामध्ये…

Read More

मदतीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांना शासनाने आर्थिक मदत द्या – उ.बा.ठा ची मागणी

मलकापूर :- मलकापूर शहर व तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे व नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे तसेच नदीकाठच्या नागरिकांचे सुद्धा फार नुकसान झाले आहे तरी मलकापूर शहरांमध्ये काही नागरिकांना आर्थिक मदत शासनाकडून होत आहे परंतु याच्यामध्ये दुटप्पीपणाचे राजकारण होत असून ज्या नागरिकांचे खरंच नुकसान झाले आहे ते मदतीपासून वंचित राहत आहे तरी शासनाने शहरात व तालुक्याचा सर्वेक्षण…

Read More

शिवसेना ( उबाठा )तालुकाप्रमुख दीपक चांभारे यास खावटी प्रकरणी अटक ; 80 हजार रु. भरल्याने शर्तीवर सोडले!

मलकापूर :- खावटी प्रकरणात रक्कम न भरल्याने न्यायालयाने काढलेल्या वारंट वरून स्थानिक गुन्हा शाखा बुलढाणा यांनी शिवसेना (उबाठा) चे तालुका प्रमुख दिपक चांभारे यांना अटक करून अकोला न्यायालयात हजर केले असता त्याने खावटी प्रकरणात ८० हजार रूपये भरल्याने न्यायलयाने अटी व शर्तीवर सोडून दिले आहे. याबाबतची माहिती अशी की, मलकापूर येथील शिवसेना (उबाठा) चे तालुका…

Read More

कोलते विद्युत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची जायकवाडी जलविद्युत केंद्राला औद्योगिक भेट

  मलकापूर: पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, मलकापूरच्या विद्युत अभियांत्रिकी विभागातील दुसऱ्या वर्षाच्या ५२ विद्यार्थ्यांनी १६ ऑक्टोबर २०२४ रोजी पैठण येथील जायकवाडी जलविद्युत केंद्राला औद्योगिक भेट दिली. या भेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना जलविद्युत उत्पादन प्रणालींचा वास्तविक अनुभव मिळवून देणे आणि नवीनीकरणीय ऊर्जा उत्पादनाच्या कार्यात्मक पैलूंवर माहिती प्रदान करणे होता. या औद्योगिक भेटीच्या आयोजनामध्ये…

Read More

नूतन विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सॉफ्ट टेनिस स्पर्धेत राज्यस्तरासाठी निवड

मलकापूर:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य , पुणे तथा जिल्हा क्रीडा परिषद अमरावती व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय सॉफ्ट टेनिस स्पर्धा विभागीय क्रीडा संकुल ,अमरावती येथे दि. १४ व १५ ऑक्टोबर रोजी पार पडल्या. त्यामध्ये नूतन विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरासाठी निवड झाली आहे. विभागीय स्तरावर…

Read More

अज्ञात व्यक्तीने पेटवली सोयाबीनची सुडी.. शेतकऱ्याचे 70 हजाराचे नुकसान, मलकापूर तालुक्यातील घटना!

मलकापूर : तालुक्यातील बेलाड शिवारातील विनोद पुंजाजी संबारे (वय ४८) यांच्या शेतातील सोयाबीनची गंजी अज्ञात व्यक्तीने पेटवली. यामध्ये त्यांचे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले.याबाबत संबारे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बेलाड शिवारात विनोद संबारे व ज्ञानेश्वर संबारे या दोघांनी आपल्या शेतातील सोयाबीन सोंगून शेतात एकाच ठिकाणी गंजी केली होती. शेतातून घरी आल्यावर कोणीतरी…

Read More

महा-हब-इन्क्युबेटर आणि इनोव्हेशन सेंटरच्या संचालकपदी प्रसन्न देशपांडे

मलकापूर:- येथील युवा उद्योजक व चैतन्य उद्योग समुहाचे संचालक प्रसन्न अशोकराव देशपांडे यांची महाराष्ट्र शासनाच्या महा-हब इन्क्यूबेटर अॅन्ड इनोव्हेशन सेंटरच्या संचालकपदी नियुक्ती झाली आहे. ५ ऑक्टोबरच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्रातील नाविन्यपूर्ण उद्योजकतेला चालना देण्यासाठी ठाणे जिल्ह्यात महा- हब इन्क्यूबेटर आणि इनोव्हेशन सेंटर स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे. हे सेंटर चालविण्यासाठी कंपनी कायदा २०१३ मधील…

Read More

पद्म. डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथे कर्करोग प्रतिबंधक लसीकरणाबाबत महत्त्वपूर्ण जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

  मलकापूर : पद्म. डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात कर्करोग प्रतिबंधक लसीकरणाविषयी महत्त्वपूर्ण जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या वैद्यकीय सुविधांअंतर्गत प्रा. तेजल खर्चे आणि महाविद्यालयीन वैद्यकीय सेलच्या इंचार्ज प्रा. रुतुजा पाटील यांनी केले. कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याने आणि त्याच्या संभाव्य धोका वाढत असल्याने या कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत आवश्यक ठरले….

Read More
error: Content is protected !!