खाकी वर्दीचा मान राखणारा मलकापूर शहर स्टेशन चा एक पोलीस कर्मचारी… एका छोट्याशा मदतीतून पोलिसांच्या प्रतिमेला दिले नवे रूप
मलकापूर ( दिपक इटणारे ):- जेव्हा कधी पोलीस म्हटलं की डोळ्यासमोर कडक शिस्त, आदेश आणि कधी कधी उद्धट वर्तनाचं चित्र उभं राहतं. परंतु मलकापूर शहरातील एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या साध्या पण हृदयस्पर्शी वागणुकीने नागरिकांच्या मनातील हा गैरसमज क्षणात दूर केला. रस्त्यावर धावत बस पकडण्यासाठी झगडणाऱ्या एका छोट्याशा मुलाची ओढ ओळखून, त्याला मदतीचा हात देणारा हाच…
