धान्य विक्रेत्याच्या मुलीची कर्तृत्वगाथा; रोशनी तिवारी सीए परीक्षेत उत्तीर्ण
मलकापूर :कष्टाची किमया आणि जिद्दीची ताकद असेल तर कोणतेही स्वप्न दूर राहत नाही, याचे प्रेरणादायी उदाहरण मलकापूर येथील कु. रोशनी तिवारी हिने घालून दिले आहे. धान्य विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या वडिलांच्या मुलीने देशातील अत्यंत कठीण समजली जाणारी चार्टर्ड अकाउंटंट (सीए) परीक्षा उत्तीर्ण होत यशाचा मानाचा तुरा रोवला आहे. मलकापूरच्या जुन्या गाव परिसरातील रहिवासी विजय…
