Headlines

स्वातंत्र सैनिक स्व. दामोदरदासजी रावत यांच्या पुण्यस्मरणनिमित गरजू विदयार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

मलकापूर:- स्थानिक नगर सेवा समिती द्वारा संचालित ली. भो. चांडक विद्यालयात दि.31 मे रोजी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.दिल्ली येथे कार्यरत असलेले विशाल रावत यांनी आपले आजोबा स्वातंत्र सैनिक स्व. दामोदरदासजी रावत यांच्या 25 व्या पुण्यस्मरणानिमित्त चांडक विद्यालतील गरीब व गरजू विदयार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. यावेळी मा. ता. संघचालक ज्ञानदेव पाटील, मा. नगर सहसंघचालक…

Read More

पंचपरिवर्तनयुक्त भारताच्या उभारणीची गरज – श्रीधररावजी गाडगे

  चिखली (जि. बुलढाणा), 2 जून कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संतुलन, सामाजिक समरसता, स्व आधारित व्यवस्था निर्मिती आणि नागरिक शिष्टाचार व कर्तव्याचे पालन यातून आपणा सर्वांना पंचपरिवर्तनयुक्त भारताची उभारणी करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मा. प्रांत सहसंघचालक श्रीधरराव गाडगे यांनी येथे केले. चिखली येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विदर्भ प्रांत ‘संघ शिक्षा वर्ग (सामान्य)’च्या समारोप प्रसंगी ते बोलत…

Read More

संचालकांची गाडी अडवून धक्का बुक्की करून दगडफेक केली, तसेच जमाबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नऊ जणांसह 150 ते 200 जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल

मलकापूर:- कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या सभापती पदाच्या अविश्वास ठराव मतदान प्रक्रीये दरम्यान नांदुरा रोडवरील जिल्हा मध्यवर्ती केंद्रीय सहकारी पतसंस्था मलकापुर चे समोर गैरकायद्याची मंडळ जमून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन तसेच संचालकांची गाडी अडवून धक्का बुक्की करून दगडफेक केली तसेच या घटनेत तीन पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहे. या प्रकरणी नऊ जणासह 150 ते 200…

Read More

कृ.उ.बा.स. च्या सभे पूर्वीच मलकापुरात हाय होल्टेज ड्रामा; पोलिसांवर दगडफेकचा व्हिडीओ व्हायरल

मलकापूर:- मलकापूर (प्रतिनिधी) : मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती भाजपचे शिवचंद्र तायडे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर आज दिनांक ३१ मे रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभे पूर्वीच कार्यकर्त्यांचा प्रचंड गदारोळ बघायला मिळाला. दरम्यान दोन्ही गट समोरासमोर आल्याने प्रचंड नारेबाजी करण्यात आली. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी…

Read More

मलकापूरच्या या परिसरात 144 कलम लागू..मलकापूरचे सभापती यांच्याविरुद्ध उद्या अविश्वास ठराव सभा..

मलकापूर (प्रतिनिधी) – कृषी उत्पन्न बाजार समिती मलकापूरचे सभापती शिवचंद्र तायडे यांचेविरूध्द अविश्वास ठराव पारीत करण्याबाबत सदस्यांनी केलेल्या मागणी अनुषंगाने ३१ मे रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार मलकापूर कार्यालयाचे सभागृहामध्ये सकाळी ११ वाजता विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. सभा कालावधीत कायदा व सुव्यवस्था परिस्थिती कायम राहण्याच्या दृष्टीने तसेच सभा निर्भय व नि:पक्षपातीपणे…

Read More

अल्पवयीन मुलींचा छळ करून पसार झालेल्या आरोपी शिक्षकास पावणे दोन महिन्यानंतर केली अटक

मोताळा : चौथ्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या दोन अल्पवयीन विद्यार्थिनींचा दि. ३ एप्रिल रोजी लैंगिक छळ करून पसार झालेल्या शिक्षकास तब्बल पावणे दोन महिन्यानंतर बुधवारी, दि. २९ बोराखेडी पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका जिल्हा परिषदच्या शाळेत शिक्षक…

Read More

गोठ्यात बांधलेल्या बकऱ्यांवर लांडग्याचा हल्ला, आठ बकऱ्याा ठार,चिखली तालुक्यातील घटना

चिखली:- तालुक्यातील पळसखेड जयंती शेतशिवारातील दिलीप राजाभाऊ खरात यांच्या गोठ्यावर लांडग्याने रात्रीच्या सुमारास हल्ला चढवीत बांधलेल्या आठ बकऱ्यांना ठार केल्याची घटना २९ मे च्या सकाळी उघडकीस आली. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील पळसखेड जयंती शिवारातील गट नं. ११७ मधील दिलीप राजाभाऊ खरात यांनी त्यांच्याकडील आठ बकऱ्या नेहमीप्रमाणे आपल्या गोठ्यात बांधल्या होत्या. २८ मेच्या…

Read More

क्लास न लावता कु. दिव्या सुभाष ठोसर हि इयत्ता दहावीच्या परिक्षेत ८९.८० गुण घेऊन झाली उत्तीर्ण

खामगाव :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2024 या वर्षाचा निकाल सोमवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. यात शेलोडी येथील जागृती ज्ञानपीठची विद्यार्थीनी, पिंप्राळा येथील रहिवासी कु. दिव्या सुभाष ठोसर हिने इयत्ता दहावीच्या परिक्षेत ८९.८० टक्के गुण घेवून उत्तीर्ण झाली आहे. दिव्या ही ग्रामीण भागातील असून तिला कोणतेही क्लास न…

Read More

चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत द्या – मंगलाताई पाटील यांची निवेदनाद्वारे मागणी

मलकापूर:- चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून लाभार्थ्यास योग्य ती आर्थिक मदत द्यावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष महिला काँग्रेस च्या मंगलाताई पाटील यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना आज दिनांक 29 मे रोजी एका निवेदनाद्वारे केली. दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की 26 मे रोजी जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी विशेष करून घाटाखालील खामगाव, शेगाव, जळगाव, जामोद, संग्रामपूर,…

Read More

चक्रीवादळ व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची तात्काळ सरसकट मदत द्या – अक्षय पाटील यांची मांगणी

जळगाव (जामोद) :- रविवार दि. २६ मे २०२४ रोजी जळगांव जामोद तालुक्यातील अनेक गावात मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ व अवकाळी पावस झाला यामुळे शेतकरी ,नागरीकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. या वादळामुळे शेतकऱ्यांचे केळी, पपई, हायब्रीड ,कांदा व आदी काही पिके जमीनदोस्त झाली त्याचबरोबर छोट्या-मोठ्या व्यवसायीकांचे व राहत्या घरांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे लोकांच्या गुरा-ढोरांच्या गोठ्यांचे…

Read More
error: Content is protected !!