Headlines

मलकापूर तालुक्यातील दाताळा येथे मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी; एकाविरुद्ध गुन्हा

  मलकापूर :- तालुक्यातील दाताळा येथील एका घरात विद्युत मीटरमध्ये छेडछाड करून गेल्या वर्षभरापासून वीजचोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक अभियंता संदीप मधुकर श्रीधनकर (मलकापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मोहम्मद शाह बादशाह आसखान (वय ६०, रा. इंदिरा नगर, दाताळा) यांच्या घरी तपासणीदरम्यान मीटरची बॉडी उघडून न्युट्रल सीटीची…

Read More

मलकापूर तालुक्यातील उमाळी येथे आकोडा टाकून वीजचोरी; एकाविरुद्ध गुन्हा

  मलकापूर :- तालुक्यातील उमाळी येथे लघुदाब विद्युत वाहिनीवर थेट आकोडा टाकून वीजचोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक अभियंता संदीप मधुकर श्रीधनकर (मलकापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, प्रल्हाद राजाराम सातव (वय ६०, रा. उमाळी) यांच्या राहत्या घरी तपासणीदरम्यान सुमारे २० फुट लांबीची काळ्या रंगाची वायर वापरून…

Read More

चिखला काकड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून दोन गटांत भीषण तणाव; महिला पदाधिकाऱ्यावर हल्ल्याचा आरोप, ३७ जणांवर गुन्हे तर २१ अटकेत

  लोणार :- तालुक्यातील चिखला काकड येथे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या उभारणीवरून दोन गटांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला असून गावातील वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते. या प्रकरणी पोलिसांनी ३७ जणांविरुद्ध गुन्हे नोंदवून २१ जणांना अटक केली आहे. गावात काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तींनी पुतळा उभारला होता. तो अन्य ठिकाणी हलवावा की नाही, या…

Read More

बोराखेडी परिसरात संशयास्पद परिस्थितीत आढळला मुलीचा मृतदेह; घटना की घातपात?

  मोताळा : – तालुक्यातील बोराखेडी शिवारात दुपारी एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा सुरू केला. प्राथमिक तपासात मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, नेमकी घटना कशामुळे घडली याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, फॉरेन्सिक पथकाला…

Read More

बंद घर फोडून ६४ हजारांची रोकड चोरी; खामगाव तालुक्यातील घटना!

  खामगाव : – तालुक्यातील कोलोरी गावात बंद घर फोडून ६४ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीपक सोनाजी अंभोरे (वय २४, रा. कोलोरी) हे १७ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे १२ वाजता घराला कुलूप लावून बाहेर…

Read More

सहीच्या कारणावरून वाद; सरपंचांविरुद्ध पोलिसांत गुन्हा!

    डोणगाव : – मेहकर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे सरपंचांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल झाल्याने ग्रामपंचायत परिसरात खळबळ उडाली आहे. “तू आमचा माणूस नाही” असे म्हणत शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंजाब लक्ष्मण गायकवाड (वय ४५, रा. विठ्ठलवाडी) हे १३ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे साडेबारा वाजता बांधकाम कामगार नोंदणी फॉर्मवर…

Read More

मला पैशांसाठी त्रास देत आहेत; चिट्ठीत उल्लेख, खामगाव तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्या!

  खामगाव : – तालुक्यातील वाडी येथे सावकारी व्यवहार व शेती संदर्भातील आर्थिक वादातून ५५ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (१९ फेब्रुवारी) सकाळी उघडकीस आली. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृत शेतकरी भास्कर लक्ष्मण तायडे (रा. वाडी) यांनी राहत्या घरी हे टोकाचे पाऊल उचलले. घटनास्थळी पोलिसांना आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी…

Read More

ग्राम आळंद येथे पारंपरिक दिंडीने शिवजयंती उत्साहात साजरी

  आळंद :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ग्राम आळंद येथे तरुणांच्या पुढाकारातून पारंपरिक पद्धतीने दिंडी काढून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. डीजेच्या गोंगाटाला फाटा देत टाळ-मृदंगाच्या निनादात आणि भगव्या पताकांच्या साक्षीने गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. शिवभक्तांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून गावातील मुख्य मार्गावरून दिंडी काढली. “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला….

Read More

चोरट्यांमुळे दाताळा गाव अंधारात; चोरट्यांनी असं काय केलं?

  मलकापूर :- तालुक्यातील दाताळा शिवारात अज्ञात चोरट्यांनी महावितरणच्या दोन डीपींवरील सुमारे ३००० मीटर लांबीची अॅल्युमिनियम विद्युत तार चोरी केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १५ फेब्रुवारीच्या रात्री १० वाजेपासून ते १६ फेब्रुवारीच्या पहाटे ६ वाजेपर्यंतच्या कालावधीत ही चोरी घडली. गावकरी व…

Read More

मेहकर तालुक्यात अवैध अफू लागवडीचा पर्दाफाश; १.३२ कोटींचा मुद्देमाल जप्त

  मेहकर : – तालुक्यातील पांग्री काटे शिवारात सुरू असलेल्या अवैध अफू लागवडीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धाडीत अंदाजे १ कोटी ३२ लाख ९ हजार ४०० रुपये किमतीची अफूची झाडे व बोंडे जप्त करण्यात आली असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. गुप्त माहितीनुसार पोलिसांचे पथक सोमवारी रात्री गस्त…

Read More
error: Content is protected !!