शेतातील बोरीच्या झाडाला गळफास; विटाळीतील शेतकऱ्याची आत्महत्या
मलकापूर :- नांदुरा तालुक्यातील विटाळी येथील एका ४७ वर्षीय इसमाने शेतातील बोरीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. शुक्रवारी (६ जून) सकाळी ही बाब उघडकीस आल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. याप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत व्यक्तीचे नाव विश्वनाथ साहेबराव क्षिरसागर (वय ४७, रा….
