Headlines

vidharbh

पिंप्रीगवळीत चोरांची दहशत; हार्डवेअर दुकान फोडून रोकड लंपास, घटना सीसीटीव्हीत कैद

पिंप्रीगवळी : गावात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असतानाच पुन्हा एकदा चोरट्यांनी आपली दहशत दाखवून दिली आहे. बसस्थानकाजवळील हार्डवेअर दुकान फोडून चोरट्याने थेट काउंटरमधील रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली असून, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने पोलिस तपासाला महत्त्वाचा धागा मिळाला आहे. येथील समाधान देविदास ठोसर…

Read More

पत्रकार अजय टप यांना जीवे मारण्याची धमकी कंत्राटदारावर तातडीच्या कारवाईची मागणी

मलकापूर : विदर्भाच्या प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलकापूर शहरात पत्रकारांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बुलढाणा रोडवरील दुभाजक सौंदर्यीकरणाच्या अंदाजे १.५ कोटी रुपयांच्या कामासंदर्भात वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित कंत्राटदाराने पत्रकार अजय टप यांना थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना केवळ एका पत्रकारावर झालेला हल्ला नसून अभिव्यक्ती स्वातंत्र्य,…

Read More

मलकापूर तालुक्यातील विज्ञान प्रदर्शनीत नूतन इंग्लिश स्कूलची चमकदार बाजी “प्लास्टिक पायरोलिसिस” मॉडेलला प्रथम क्रमांक

  मलकापूर :- दाताळा येथील डी.ई.एस. हायस्कूलमध्ये झालेल्या मलकापूर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत नूतन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनीने नावीन्यपूर्ण कल्पकतेची छाप पाडत प्रथम क्रमांक पटकावला. ‘प्लास्टिक पायरोलिसिस’ या पर्यावरणपूरक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असणाऱ्या मॉडेलद्वारे कु. गार्गी सागर शिकेतोड हिने प्रेक्षक आणि परीक्षकांचे लक्ष वेधून घेत उत्कृष्ट कामगिरी नोंदवली. तालुक्यातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयातील नवकल्पना, प्रयोग आणि…

Read More

जळगाव खान्देश विवाह सोहळ्यासाठी निघालेले बेपत्ता दाम्पत्यचा सीसीटीव्हीने उलगडला भीषण अपघाताचा सत्यकथन

मलकापूर/नांदुरा:- जळगाव खान्देश येथे नात्यातील विवाह सोहळ्यासाठी आनंदाने निघालेला प्रवास क्षणात काळ बनला. तेलंगणातून कारने निघालेल्या पती-पत्नीचे बेपत्ता होणे, त्यानंतर तिसऱ्याच दिवशी रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कारसह दोघांचे मृतदेह सापडणे या संपूर्ण प्रकरणाने कुटुंबासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती. मात्र या भीषण दुर्घटनेचे खरे कारण सीसीटीव्ही फुटेजसमोर आल्यानंतर स्पष्ट झाले आहे. तेलंगणातील सूर्यपेठ जिल्ह्यातून…

Read More

मलकापूर रेल्वे स्टेशनवर थरार; मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले, मोठी दुर्घटना टळली!

मलकापूर :- रेल्वे स्टेशनवर सोमवारी संध्याकाळी क्षणभरासाठी भीषण दुर्घटनेचे सावट निर्माण झाले. नागपूरकडे जाणाऱ्या एका मालगाडीचे दोन डबे अचानक रुळावरून घसरल्याने स्टेशन परिसरात एकच गोंधळ उडाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठी दुर्घटना टळली. युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सायं. पाचच्या सुमारास घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, तांत्रिक पथके आणि रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव…

Read More

थंडीने थरथरणाऱ्या निराधारांना माणुसकीची उब; अजय टप यांचा हृदयस्पर्शी उपक्रम

मलकापूर :- शहरात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा चटका वाढत चालला असून उघड्यावर झोपणाऱ्या, घरदार नसलेल्या आणि गोरगरीब लोकांची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. अंगावर उबदार कपडा नाही, रात्री थंडीचा शिरशिरी आणणारा स्पर्श, आणि पहाटेपर्यंत तापमानाची गोठवणारी घसरण… अशी झुंज देणाऱ्यांच्या मदतीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी एक मानवतेने भरलेला पुढाकार घेतला आहे….

Read More

विद्यार्थी आणि शिक्षक या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना! नोट्स आणि मार्क वाढवून देण्याच्या आमिषाने शिक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; स्क्रिन रेकॉर्डिंग व्हायरल करून धमकावल्याची तक्रार; मलकापूरातील धक्कादायक घटना

मलकापूर:- मलकापूर शहरात एका अल्पवयीन विद्यार्थिनीला नोट्स आणि मार्क वाढवून देण्याच्या बहाण्याने बोलावून तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर व्हिडिओ स्क्रिन रेकॉर्डिंग व्हायरल करून धमकावल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिक्षकासह एका अल्पवयीन मुलीवर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार, आरोपी मुकेश परमसिंग रबडे (वय ४०, रा. तरोडा,…

Read More

नूतन इंग्लिश स्कूलची कृष्णा पाटील राज्यातून सरळ राष्ट्रीय पातळीवर

मलकापूर :- स्थानिक नूतन इंग्लिश स्कूलचा अभिमान वाढवत कु. कृष्णा राजेश पाटील हिने राज्यस्तरावर चमकदार कामगिरी करत राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे तथा जिल्हा क्रीडा परिषद पुणे (बारामती) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धा २०२५ मध्ये १४ वर्षांखालील मुलींच्या गटातून कृष्णाने प्रभावी खेळ सादर केला….

Read More

नूतन इंग्लिश स्कूलमध्ये संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे प्रेरणादायी मार्गदर्शन

मलकापूर : आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी योग्य दिशादर्शनाची आवश्यकता आहे. याच उद्देशाने नूतन इंग्लिश स्कूलमध्ये दि. ४ डिसेंबर, गुरुवारी संरक्षण खात्यात दीर्घ सेवा केलेले ब्रिगेडियर श्रीकांत मुकुंद हरिदास यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास, क्रीडा कौशल्य आणि शैक्षणिक प्रगती याबाबत प्रभावी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास स्व. डॉ. वि. भी. कोलते कॉलेज ऑफ इंजिनियरिंगचे प्राचार्य डॉ….

Read More

मलकापूर शहरात पुन्हा एकदा चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील पोत हिसकावून चोरटा पसार; महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

  मलकापूर : शहरात गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या गळ्यातील चैन, पर्स किंवा पोत हिसकावण्याच्या घटना सतत वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ‘चोरांचा हात इतका लांब की पोलिसांनाही चकवा’ अशी नागरिकांत कुजबूज सुरू असतानाच, आज दि. ४ डिसेंबर रोजी रात्री 8.15 वाजता आणखी एक गंभीर घटना तुलसी ज्वेलर्स मार्गावर घडली. आयडिबीआय बँक समोरून…

Read More
error: Content is protected !!