मलकापूर रोडवरील घरफोडी प्रकरणात चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
बुलढाणा :- शहरात बंद घरांना लक्ष्य करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत चोरास बुलढाणा शहर पोलिसांनी अखेर अटक केली आहे. शेख अरबाज ऊर्फ ‘मेमरी’ शेख मेहमुद (वय २५) असे अटकेत असलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून एकूण १ लाख ९ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मलकापूर रोड परिसरातील सचिन खिल्लारकर यांच्या निवासस्थानी…
