मलकापूर:- खंडणीसाठी अपहरण करून शेगांव तालुक्यातील नागझरी येथील निरागस बालक “कृष्णा”च्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी मराठा पाटील युवक समिती,मलकापूर यांचे वतीने तहसीलदार साहेब मलकापूर यांना निवेदन सादर करण्यात आले.
शेगाव तालुक्यातील नागझरी येथील 14 वर्षीय कृष्णा राजेश्वर कराडे या निरागस मुलाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली,ही घटना समाज मन सुन्न करणारी असून मराठा पाटील युवक समिती या घटनेचा अत्यंत तीव्र शब्दात निषेध करत आहे.निष्पाप बालक कृष्णा च्या हत्येचा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवून अशा प्रकारच्या समाज विघातक वृत्ती असणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी तसेच यात सामील असणाऱ्या गुन्हेगार यांना तात्काळ अटक करून त्यांना देखील फाशीची शिक्षा व्हावी या करिता मराठा पाटील युवक समिती,मलकापूर यांच्या वतीने तहसीलदार साहेब यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी मराठा पाटील युवक समिति जिल्हा उपाध्यक्ष देव कुयटे, तालुका अध्यक्ष पंकज पाटील,शहर अध्यक्ष भूषण पाटील,विद्यार्थी समिती शहर अध्यक्ष रोहित मापारी,तालुका उपाध्यक्ष योगेश पाटील, सौ.मंगलाताई पाटील,सौ.मंदाकिनी चांभारे,सौ.पुष्पा मापारी,विजय काळे,अमोल टप,सुजित भोसले,विशाल कुयटे, परमेश्वर अढाव,वीरेंद्र कासे, प्रशांत अढाव,सुनील पाटील,सागर वणारे,साहिल रायपुरे, महेश रायपुरे, अरविंद चव्हाण,जय राठीं,नागेश गायकवाड,तेजस हिंगे याचे सह समाज बांधवांच्या सह्या आहेत.