मलकापूर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज २७ जुलै रोजी उबाठाचे जिल्हा प्रमुख वसंतराव भोजने आदेशानुसार माजी युवासेना शहर प्रमुख पवन गरूड यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
उबाठाचे शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माजी युवासेना शहर प्रमुख पवन गरूड यांचे संकल्पनेतून आज जीवनज्योती ब्लड हॉस्पीटलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ऋषिकेश केळोदे, दिपक भोलनकार, अक्षय रायपुरे, सतीष वाघ, पवन गरूड, सागर श्रीनाथ, रोशन पाटील यांचेसह आदींनी रक्तदान केले. तर मूक-बधिर विद्यालय येथे विद्यार्यांना भोजन वितरीत करण्यात आले.
यावेळी उबाठाचे शहर प्रमुख गजानन ठोसर, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत, तालुका प्रमुख दिपक चांभारे पाटील, इमरान लकी, शकील जमदार, समद कुरेशी, चाँद चव्हाण यांचेसह बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.