मलकापूर : शहरातून जाणाऱ्या बुलढाणा रोडवर अपघातांचे सत्र सुरूच असून, दाताळा परिसरातील रुद्र पेट्रोल पंपाजवळ भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ९ नोव्हेंबर रोजी घडली. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला असून, मृत्यूच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या प्रकरणी शैलेंद्र सरदारसिंग जाधव (रा. टाकरखेड, ता. नांदुरा) यांनी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे चुलत भाऊ बबनसिंग जाधव हे ९ नोव्हेंबर रोजी कामानिमित्त मलकापूर येथे आले होते. दरम्यान, दाताळा येथील रुद्र पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या मोटारसायकल क्रमांक एमएच २८ बीपी ५२७८ ला अज्ञात भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात योगेश जाधव यांचा मृत्यू झाला, तर दुचाकीचे सुमारे २० हजार रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध अपघात क्रमांक २३०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम २८१, १०६(१), ३२४(१) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १३४ (अ), १३४ (ब) व १८४ अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.