Headlines

शेतातून टिप्पर नेल्याच्या कारणावरून वाद; दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी तक्रारी, एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल, मलकापूर तालुक्यातील घटना

मलकापूर : शेतातून टिप्पर नेल्याबाबत विचारणा केल्याने दोन गटांत वाद होऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण झाल्याची घटना १० नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास मलकापूर एमआयडीसी परिसरात घडली. या प्रकरणात दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध तक्रारी दाखल केल्याने एमआयडीसी पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे नोंदविले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, म्हैसवाडी येथील जितेंद्र दिलीप राणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १० नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास त्यांनी शुभम लाहुळकर (वय २५, रा. चिंचोळ, ता. मलकापूर) याला आपल्या शेतातून टिप्पर नेल्याबाबत विचारणा केली. यावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. शुभम लाहुळकर याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून हाताला दुखापत केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच त्याचा चुलत भाऊ मंगेश लाहुळकर यानेही चापटाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात अप. क्र. १२९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *