सैनिक कधीही सेवानिवृत्त होत नाही कोणत्या ना कोणत्या माध्यमातून देशाची सेवा करीतच असतात- आ.चैनसुख संचेती

मलकापूर : राम विश्वासराव तायडे यांचे सारखे हजारो सैनिक देशाचे दिवस-रात्र सेवा करतात. म्हणूनच तुम्ही आपण शांततेत झोपू शकतो. सैनिकच देशाची खरी ताकद असून सैनिक कधीही सेवानिवृत्त होत नाही तर ते आजीवन कोणत्या ना कोणत्या माध्यमातून देशाची सेवा करतच असतात, असे प्रतिपादन आ.चैनसुख संचेती यांनी वरखेडचे सुपुत्र राम विश्वासराव तायडे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित सेवा गौरव सोहळ्या प्रसंगी केले.
वरखेड ता.मलकापूर येथील राम विश्वासराव तायडे यांनी तब्बल २२ वर्ष भारतीय सैन्य दलात कार्य करून देशसेवा केली. ते ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले. आज ५ सप्टेंबर रोजी त्यांचे मलकापूर रेल्वे स्टेशनवर आगमन होताच या ठिकाणी मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता इंजिनीयर सचिन तायडे व अनेकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. त्यानंतर शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना राम तायडे यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. तर त्यांच्या मूळगावी वरखेडे येथे त्यांचे आगमन होताच त्यांची गावातून उघड्या जीपमधून मिरवणूक काढत गावकर्‍यांनी त्यांचे ठिकठिकाणी स्वागत केले. यावेळी देशगौरवाच्या घोषणा व देशभक्तीपर गितांनी वातावरण दणाणून गेले.
त्यानंतर वरखेड येथे श्रीराम मंदिर येथे त्यांच्या सेवानिवृत्त बद्दल सेवा गौरव सोहळ्याचे आयोजन तायडे परिवार व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी मतदार संघाचे आमदार चैनसुख संचेती, बुलढाणा जिल्हा केंद्रीय बँकेचे संचालक शिवचंद्र तायडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काजळे पाटील, उपसभापती नागो राणे, संचालक भगवान पाटील, प्रविण पाटील, साहेबराव पाटील, विजय साठे, जनक्रांती फाऊंडेशनच्या अध्यक्षा इंजि.सौ.कोमलताई सचिन तायडे, युवानेते यश संचेती, शैलेंद्रसिंह राजपूत सर, वरखेडचे माजी सरपंच निवृत्ती तायडे, मेजर दिनेश तायडे, सुभेदार नागेश तायडे, विश्वासराव तायडे, बुलढाणा येथील गणेश सरोदे, युवानेते संभाजी शिर्वेâ, नांदुरा येथील ज्ञानेश्वर ढोले, समाधान धुरंदर आदींसह अनेक मान्यवर व आजी-माजी सैनिक उपस्थित होते
यावेळी सेवानिवृत्तीबद्दल राम तायडे व त्यांच्या पत्नी सौ.राजश्रीताई तायडे तसेच विश्वासराव तायडे व त्यांच्या पत्नी सौ.सत्यभामाताई तायडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला वरखेड गावातील नागरिकांसह पंचक्रोशितील अनेक मान्यवर, नागरिक, माजी सैनिक, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव इंजि.सचिन तायडे यांच्या मार्गदर्शनात सर्व तायडे परिवार, गावकरी मंडळ, नातेवाईक, आप्तेष्ट, मराठा सेवा संघाचे पदाधिकारी व युवकांनी परिश्रम घेतले.
चौकट
हा सत्कार म्हणजे केवळ एका व्यक्तीचा सत्कार नसते, तर या सत्कारातून त्यांच्या कुटुंबाला व त्या सैनिकांना आपण केलेल्या सेवेचा अभिमान वाटतो व आपण केलेल्या सेवेची कोणीतरी दखल घेतो,याचा हेवा सुद्धा वाटतो तसेच या सत्कारामधून अनेक नवतरुण प्रेरणा घेऊन त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून देशसेवेसाठी/ सैनिक होण्यासाठी प्रेरित होतात हाच मुख्य उद्देश या सोहळ्यामागील होता.
-इंजि.सचिन निवृत्ती तायडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!