Headlines

भावी इंजिनिअर्सच्या नव्या प्रवासाचा शुभारंभ – व्ही. बी. कोलते इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इंडक्शन प्रोग्राम भव्य सोहळा संपन्न

मलकापूर : -स्थानिक लोकसेवा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉ. व्ही. बी. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मलकापूर येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ मधील प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या नवप्रविष्ट विद्यार्थ्यांसाठी विशेष ‘इंडक्शन प्रोग्राम’ आणि ‘पालक सभा’ अत्यंत उत्साही, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडली. सदर कार्यक्रमाचा मंगलमय प्रारंभ मंचावरील मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. या सोहळ्याला महाविद्यालयाचे मार्गदर्शक प्राचार्य डॉ. अनिल खर्चे, संस्थेचे सचिव मा. डॉ. अरविंदजी कोलते, कोषाध्यक्ष श्री. सुधीरभाऊ पाचपांडे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डीन डॉ. युगेश खर्चे, आयक्यूएसी को-ऑर्डिनेटर प्रा. आर. एम. चौधरी, कार्यक्रम समन्वयक प्रा. मोहम्मद जावेद यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच महाविद्यालयाच्या विविध विभागांचे विभागप्रमुख — प्रा. एन. ए. खर्चे , प्रा. एस. एल. फरपट , प्रा. वाय. पी. सुशिर आणि प्रा. एस. एम. भोळे मंचावर विराजमान होते. या प्रसंगी विविध वृत्तपत्रांचे सन्माननीय पत्रकार बंधू, महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, नवप्रविष्ट विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थिनी व महिलांच्या सुरक्षेबाबत जाणीव जागृती व्हावी या उद्देशाने कार्यक्रमाला ‘दामिनी पथका’च्या अधिकाऱ्यांनी विशेष उपस्थिती दर्शवली होती. यावेळी महाविद्यालयाच्या वतीने प्रा. संगीता खर्चे मॅडम यांच्या हस्ते दामिनी पथकातील उपस्थित सदस्यांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार व सन्मान करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी प्रास्ताविक व स्वागत प्रा. एस. डी. लवंगे यांनी केले. त्यांनी उपस्थितांचे स्वागत करत दिवसभराच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा उपस्थितांसमोर मांडली. शैक्षणिक सत्रात ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डीन डॉ. युगेश खर्चे यांनी ‘३६०° स्टुडंट: नीड ऑफ द आवर’ या विषयावर सखोल मार्गदर्शन करताना सांगितले की, “आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून विद्यार्थ्यांनी अष्टपैलू बनणे, तांत्रिक कौशल्यांसोबतच व्यवहारज्ञान आत्मसात करणे काळाची गरज आहे.” त्यानंतर प्रा. आर. एम. चौधरी यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून विद्यार्थ्यांमध्ये नव्या शैक्षणिक प्रवासासाठी ऊर्जेचा संचार केला. संस्थेचे सचिव मा. डॉ. अरविंदजी कोलते यांनी ‘समाज, राष्ट्र, संस्कृती आणि नवसंशोधन’ या विषयावर मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर राष्ट्रविकासासाठी कसा करावा, यावर प्रकाश टाकला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिस्त, मेहनत आणि ध्येयपूर्तीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यानंतर आचल गोळे मॅडम यांच्या उत्कृष्ट नियोजनाखाली महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला. पहिल्या सत्राची सांगता प्रा. राधिका एस. बिहाडे यांनी मानलेल्या आभार प्रदर्शनाने झाली. पहिल्या सत्रानंतर सर्व उपस्थित पाहुणे, पालक व विद्यार्थ्यांसाठी स्नेह-अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती. अल्पोपहारानंतर पालकांसाठी ‘विशेष पालक सभेचे’ आयोजन करण्यात आले. या सभेत पालकांनी आपापल्या पाल्याच्या शाखानिहाय ठरवून दिलेल्या दालनांमध्ये जाऊन विभागप्रमुखांशी थेट संवाद साधला. या सभेदरम्यान पालकांना महाविद्यालयाची शैक्षणिक पद्धती, उपस्थितीचे नियम, परीक्षा पद्धत आणि उपलब्ध सोयी-सुविधांची विस्तृत माहिती देण्यात आली.

हा भव्य कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यामध्ये प्रामुख्याने प्रा. सचिन बोरले, प्रा. बुद्धप्रिय गोपनारायण, प्रा. पूनम पठ्ठे, प्रा. दीप्ती लढे, प्रा. योगेश पाटील, प्रा. भाग्यश्री नारखेडे, प्रा. अंकुश नारखेडे, प्रा. नितीन भारांबे, प्रा. शारदा लांडे सह अनंता बराटे, सचिन कोलते, प्रतीक हांडगे, तुषार पाटील, अंकित वाघोदे आणि राहिल खान आदींनी परिश्रम घेऊन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे योगदान दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!