नायरा पेट्रोल पंपासमोर भीषण अपघात; भरधाव स्विफ्टची ऑटोला मागून जोरदार धडक, ऑटोचा चुराडा, मलकापुरातील पाच जण गंभीर जखमी

मलकापूर : वाघुड-धानोरा परिसरातील नायरा पेट्रोल पंपासमोर भरधाव स्विफ्ट डिझायर कारने ऑटोला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ऑटोचा अक्षरशः चुराडा झाला. या अपघातात ऑटोमधील पाच जण जखमी झाले असून, त्यापैकी शेख इरफान शेख इसाक (वय ५०) यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे रेफर करण्यात आले आहे. तर अन्य जखमींवर मलकापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राप्त माहितीनुसार, वाघुड-धानोरा मार्गावरील नायरा पेट्रोल पंपासमोर ऑटो क्रमांक एमएच २८ आर ३५७७ जात असताना पाठीमागून आलेल्या स्विफ्ट डिझायर चारचाकी वाहन क्रमांक एमपी ६८ झेड ई २७५८ ने ऑटोला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, ऑटोचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला. अपघातानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली.
या अपघातात साबीर खान उस्मान खान (वय २४), शेख समीर शेख सलीम, ऑटो चालक इरफान खान इसाक खान, अल्ताफ खान अफसर खान तसेच शेख इरफान शेख इसाक (वय ५०) हे जखमी झाले आहेत. यापैकी शेख इरफान शेख इसाक यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जळगाव येथे पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे. तर अन्य सर्व जखमींवर मलकापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातातील सर्व जखमी हे मुस्ताकअली नगर, पारपेठ येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. दरम्यान, स्विफ्ट डिझायर चारचाकी वाहनाचा चालक दिग्विजय सजनराव पाटील (वय ३०, रा. मराठा मंगल कार्यालयाजवळ, मलकापूर) असल्याचे समोर आले आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. अपघात नेमका कसा घडला याबाबत पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!