ज्ञान वाटणाऱ्या शिक्षकाला सोशल मीडियावरही भरभरून प्रेम; मनीष मानकर सरांचे 100K फॉलोअर्स पूर्ण

मलकापूर : आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणे हे मोठे आव्हान मानले जाते. मात्र सातत्यपूर्ण प्रयत्न, समाजहिताची भूमिका आणि दर्जेदार माहितीच्या माध्यमातून शिक्षक मनीष मानकर यांनी Instagram वर १ लाख (100K) फॉलोअर्स पूर्ण करत एक उल्लेखनीय टप्पा गाठला आहे.
मनीष मानकर हे व्यवसायाने शिक्षक असून विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी ते सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत आहेत. सरकारी योजना, पोलीस भरती, कृषी विषयक माहिती, विविध शासकीय उपक्रम तसेच समाजप्रबोधनपर व्हिडिओ तयार करून त्यांनी ही माहिती लाखो लोकांपर्यंत पोहोचवली आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना ते वेळोवेळी मोफत मार्गदर्शन करत असल्याने त्यांच्याबद्दल विश्वास आणि आपुलकी निर्माण झाली आहे.
त्यांच्या माहितीपूर्ण आणि लोकहिताच्या कामामुळे Instagram वर त्यांचे फॉलोअर्स सातत्याने वाढत गेले आणि आता त्यांनी 100K फॉलोअर्सचा महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या यशानिमित्त त्यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून समर्थक, विद्यार्थी आणि शुभचिंतकांकडून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
डिजिटल माध्यमांचा समाजहितासाठी प्रभावी उपयोग करत युवकांसाठी प्रेरणादायी ठरणारे मनीष मानकर यांचे हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे.
विदर्भ लाईव्ह परिवाराकडून शिक्षक मनीष मानकर यांना Instagram वर १ लाख फॉलोअर्स पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!