नदीत पाय घसरून पडल्याने ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

जळगाव जामोद : शहरातील गैरान (महासिद्ध महाराज नदी) परिसरात शुक्रवारी दुर्दैवी घटना घडली. नदीकाठी शौचासाठी गेलेल्या ५५ वर्षीय व्यक्तीचा पाय घसरून पाण्यात पडल्याने बुडून मृत्यू झाला.
सिद्धार्थ नगर येथील रहिवासी महादेव जागजव वागोदे (वय ५५) हे नदीकाठी गेले असताना त्यांचा पाय घसरला आणि ते पाण्यात पडले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने त्यांना नदीबाहेर काढून तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे सिद्धार्थ नगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!