शेगावमध्ये भरदिवसा दुचाकी लंपास; पोलिसांत गुन्हा दाखल

शेगाव : शहरातील बाळापूर रोड परिसरातून भरदिवसा दुचाकी चोरीची घटना घडल्याने वाहनधारकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. मुरारका शाळेजवळ उभी केलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने काही मिनिटांत लंपास केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाळकृष्ण रामकृष्ण गवळी (वय ४६, रा. मोदी नगर, बाळापूर रोड, शेगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली. दि. १ मे रोजी त्यांनी आपली एमएच २८ एएच १६०९ क्रमांकाची मोटारसायकल मुरारका शाळेजवळ उभी करून गजानन महाराज संस्थान परिसरात डिझेल आणण्यासाठी गेले होते. काही वेळाने परत आल्यानंतर त्यांना मोटारसायकल जागेवर दिसून आली नाही. परिसरात शोध घेऊनही वाहनाचा कोणताही मागमूस न लागल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत २५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात अप क्रमांक २८८/२०२६ अन्वये कलम ३०३(२) बीएनएस अंतर्गत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेका निलेश गाडगे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!