लग्न होत नसल्याने तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; मलकापूर तालुक्यातील घटना

मलकापूर : आयुष्याच्या वळणावर उभ्या असताना लग्न जुळत नसल्याच्या मानसिक तणावातून एका २२ वर्षीय तरुणाने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याची हृदयद्रावक घटना मलकापूर तालुक्यातील माकनेर येथे घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केशव बाबुराव वनारे (वय २२ वर्ष, रा. माकनेर ता. मलकापूर) हा तरुण काही दिवसांपासून लग्न होत नसल्याच्या कारणामुळे मानसिक तणावात होता. २९ एप्रिलच्या रात्री सुमारे ११.३० वाजताच्या दरम्यान त्याने दारूच्या नशेत गावाजवळील विहिरीत उडी घेतली. पाण्यात बुडाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
याप्रकरणी विश्वास मधुकर वनारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात मर्ग क्रमांक १५/२०२६ कलम १९४ भा. न्या. सं. अन्वये नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळु टाकरखेडे करीत आहेत. दरम्यान, या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!