Headlines

वीज तारा चोरीचा प्रकार; ४८ हजारांचा मुद्देमाल लंपास! नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजीची घटना

नांदुरा :- तालुक्यातील वडनेर भोलजी शिवारात वीज तारा चोरीचा प्रकार उघडकीस आला असून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटना ७ ते ८ एप्रिलदरम्यान घडल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भोजने रोहित्र परिसरातील सहा गाळ्यांमधून तीन फेज, चार वायर प्रणालीतील सुमारे १२०० मीटर लांबीची वीज तार चोरीला गेली आहे. या प्रकारामुळे वीजपुरवठा व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणी वडनेर भोलजी येथील महावितरण केंद्राचे कनिष्ठ अभियंता मंगेश प्रभाकर राणे (वय ३८) यांनी नांदुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार नवाज शेख करीत असून, चोरीचा छडा लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!