Headlines

आज पासून विश्व हिंदू परिषद – बजरंग दल मोफत वैद्यकीय सेवा चिकित्सा सप्ताहला प्रारंभ.. गरजूंनी या सेवा कार्याचा लाभ घ्यावा – विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे आव्हान

मलकापूर – मानव सेवा हीच ईश्वर सेवा स्त्री असो वा पुरुष, कितीही असो वय, कोणताही असो आजार तज्ञ डॉक्टरांचा सल्ला विनामूल्य आरोग्य तपासणी आणि औषध उपचार

हे समाज सेवेचे ब्रीद घेवून दिनांक 27 जून ते 5 जुलै 2024 रोजी पर्यंत विश्व हिंदू परिषद बजरंग दल च्या वतीने वैद्यकीय चिकित्सा तपासणी सेवा सप्ताह चे आयोजित करण्यात आले आहे या सेवा कार्य मध्ये 41तज्ञ डॉक्टर तर 4 संस्था सेवा देणार आहे.

दरवर्षी बजरंग दल तर्फे जुन ते जुलाई या काळात कोणत्या ना कोणत्या प्रकारचे सेवा कार्य समाजा करिता करण्यात येते त्याच अनुषंगाने या वर्षी सेवा कार्य गाव,वस्ती मध्ये अक्षम गरजू रुग्ण यांना मोफत वैद्यकिय चिकीत्सा देणार आहे.

मलकापूर तालुका मध्ये 21 गावात 27 जून ते 2 जुलै तर मलकापूर शहर मध्ये 10 सेवा वस्ती मध्ये 3 जुलै ते 5 जुलै, रोज रोज सकाळी 8 ते 11 भव्य आरोग्य मेळाव्याचे आयोजन केले आहे, यामध्ये यात 21ते 27 जून – धोंगर्डी, झोडगा, अनुराबाद,28 जून धानोरा, वाघुड, काटी 29 जून – रणगाव, भालेगाव शिवानी, निबोई,30 जून घिरणी, बेलाड, माकनेर1 जुलै- जांबुळधाबा,लोणवडी, घानखेड 2 जुलै दसर खेड, वाघोळा, म्हैसवाडी, विवरा 3 जुलै – सुभाचंद्र बोस नगर, पंत नगर, डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर मलकापूर 4 जुलै – संत ज्ञानेश्वर नगर, संत रोहिदास नगर, विकास नगर मलकापूर 5 जुलै- हनुमान नगर, वैदूवाडी, भीमनगर मलकापूर
शिबीर मध्ये होणारे संपूर्ण मोफत उपचार व औषधी वितरण व्यवस्था असेल त्या मध्ये हृदय रोग तपासणी, दमा, अलर्जी, फूफुस रोग तपासणी अस्थि रोग तपासणी, मधुमेह तपासणी त्वचारोग तपासणी ,बालरोग तपासणी, कान, नाक, घसा तपासणी, स्त्रीरोग तपासणी,रक्तदाब व रक्तगट तपासणी मोफत नेत्र तपासणी मोतियाबिंदू निदान उपचार आणि शत्रक्रिया साह्य मोफत E.C.G चाचणी ,दंत रोग व मुखरोग तपासणी सर्व तज्ञ डॉक्टर द्वारे निदान तसेच उपचार होणार आहे.

विश्व हिंदू परिषद – बजरंग दल वैद्यकीय सेवा चिकित्सा सप्ताह
मोफत वैद्यकीय शिबिर मध्ये
हृदयरोग, दमा, टी.बी, मधुमेह, थायरॉईड तज्ज्ञ, तसेच फिजीशियन ची सेवा सेवा डॉ.विशाल झंवर,
डॉ पवन अग्रवाल ,डॉ. चेतन जाधव, डॉ अमोल फिरके,डॉ.नितीन बराटे,
डॉ राजेश झंवर ,डॉ. रुपेश वर्मा,
डॉ. मुकेश गोठी अस्थिरोग तपासणी सर्जन- डॉ. मनोज पाटील,डॉ. राहुल चोपडे ,डॉ. प्रशांत माने जनरल सर्जन – डॉ. विनोद हागे पाटील, डॉ. अनुप धोरण, डॉ. स्वप्नील चोपडे
होमिओपॅथिक तज्ञ:डॉ. सुहास खंगार, डॉ. योगेश पटणी, डॉ. मुकेश केला ,डॉ. प्रशमिन अग्रवाल, डॉ. विवेक डागा, डॉ. चेतन सोनोने, डॉ. वैष्णवी खूपसे, चर्मरोग तपासणी :डॉ. कृष्णा वाघ आयुर्वेदिक तज्ञ: डॉ. प्रसन्ना काबरा, डॉ. राम काकडे, डॉ. अमित चौधरी,कान नाक आणि घसा तज्ञ: डॉ. भावना पाटील स्त्री रोग तज्ञ :डॉ. मयुरी धोरण,डॉ. प्रतीक्षा देशमुख,डॉ. नीलाश्री राजपूत ,डॉ. कल्याणी खांदे दंत व मुख रोग तपासणी :डॉ. श्रेयस व्यवहारे, डॉ. श्रीराम गिडवाणी बालरोग तपासणी : डॉ. रिया चोपडे ,डॉ. मितेश टावरी, डॉ. विजयसिंह राजपूत, डॉ. प्राशिक गुरचळ मैत्र तपासणी मोतीया बिंदू निदान : अर्णव नैत्रालय डॉ. प्रफुल डहाके रक्त तपासणी तज्ञ : डॉ. गिरीश टावरी संदीप लंबोदरी, पॅथॉलॉजी तंत्रज्ञ तर मोफत नेत्र तपासणी मोतियाबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया उपचार करिता संत श्री. जंगली महाराज लॉयन्स नेत्रालय, नांदुरा आणि हृदय रोग व शस्त्रक्रिया परामर्श डॉ. उल्लासराव पाटील वैदिक ए महाविद्यालय संस्था जलगांव यांन द्वारे लाभनार आहे.
या भव्य आरोग्य मेळावा चे सेवाकार्य तालुका संयोजक डॉ.मुकेश गोठी तालुका सेवा कार्य सह संयोजक दीपक कपले,
मलकापूर शहर सेवा कार्य संयोजक डॉ.मितेश टावरी,
शहर सेवा कार्य सहसंयोजक दिपक कोलते हे आहेत.
मलकापुर तालुका व शहर मधील गरजु रुग्ण यांनी या वैद्यकीय चिकित्सा सेवा सप्ताह शिबिराचा लाभ जास्तीत जास्त घ्यावा असे आव्हान बजरंग दल मलकापुर तालुक्या वतीने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!