अल्पवयीन मुलीला पळविण्याचा प्रयत्न; तरुण अटकेत

 

जळगाव जामोद :- तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी एका तरुणास अटक केली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी शाळेकडे जात असताना चौभारा परिसरातील अतुल गजानन दातीर (वय २२) याने तिला दुचाकीवर बसवून नेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मात्र, परिसरातील नागरिकांनी तत्काळ पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.या प्रकरणी जळगाव जामोद पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!