शेलापूर बसस्थानकात वादातून दोघांना मारहाण; एकाविरुद्ध गुन्हा

 

मोताळा :- तालुक्यातील शेलापूर येथे ९ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास झालेल्या वादातून दोघांना मारहाण झाल्याची घटना घडली असून, याप्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळणी येथील रहिवासी आकाश सुरेश बोदडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते आपल्या भाच्यासोबत जेवणानंतर शेलापूर बसस्थानक परिसरात थांबले होते. यावेळी शेलापूर येथील दीपक बोरसे याने त्यांच्याशी कारण नसताना वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर मारहाणीत झाले असून, या झटापटीत आकाश बोदडे आणि त्यांचा भाचा जखमी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेनंतर तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दीपक बोरसे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!